प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना
प्रधानमंत्री श्रमयोगी
मानधन योजनेंअतर्गत कामगारांची नोंदणी कशी करायची ?
असंगटीत कामगार म्हणजे
कोण ?
जसे कि ,अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, शेतमजूर, बांधकाम कामगार
, घरेलू कामगार, फिरेवाले, माथाडी कामगार, यंत्रमाग कामगार,गृहउद्योगातील कामगार, यासारख्या विविध १२७व्यवसाय गटातील कामगार .
पात्रता :-
·
असंगटीत शेत्रामध्ये काम करणारा वय वर्ष १८ ते ४० दरम्यानचा
कामगार
·
मासिक उत्पन १५०००/- पेक्षा कमी असावे.
·
कर्मचारी राज्य विमा निगम, भविष्य निर्वाह निधी अथवा
राष्ट्रीय योजनेचा सभासद नसावा.
आवश्यक कागदपत्रे :-
· आधारकार्ड
· बँक पासबुक ( राष्ट्रीय बँकचे ifsc code असावा )
· मोबाइल नो ( OTP करिता )
लाभ :-
१) वय वर्ष ६० पूर्ण झाल्यानंतर दरमहा
३०००/-रु मानधन
२) लाभार्थी कामगाराचा मृतू झाल्यास
त्याच्या वैवाहिक जोडीदारास योजना सुरु ठेवता येणार.
३) लाभार्थीस स्वेचेने योजनेतून बाहेर
पडायचे झाल्यास जमा केलेल्या अंशदानासह व्याजाची रक्कम परत मिळणार.
वयानुसार मसिक रक्कम वर्गणी :-
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेमध्ये सहभागी
होणेसाठी कार्यप्रणाली
- लाभार्थी आधारकार्ड, बँक पासबुक , मोबाइल क्रमांकासह नागरी सुविधा केंद्रास भेट देईल.
↓
- नागरी सुविधा केंद्राकडून लाभार्थीची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्यात येईल.
↓
- लाभार्थीच्या वयानुसार मासिक अंशदानाच्या रक्म्मेची गणना कण्यात येईल.
↓
- लाभार्थीकडून पहिल्या महिन्याच्या अंशदानाची रक्कम नागरी सुविधा केंद्रास रोखीने अदा करण्यात येईल .
↓
- अंशदानाची रक्कम अदा केल्यानंतर LIC द्वारे पेन्शन खाता क्रमांक जरी
करण्यात येईल.
↓
- लाभार्थीची स्वाक्षरी करण्यासाठी स्वघोषणापत्र नमुना प्राप्त होईल.
↓
- लाभार्थीने स्वाक्षरी केलेले स्वघोषणापत्रनागरी सुविधा केंद्राकडून स्कॅन करण्यात येऊन सिस्टीम मध्ये अपलोड करण्यात येईल.
↓
- नागरी सुविधा केंद्रामार्फत श्रमयोगी कार्डची प्रिंट काढण्यात येऊन लाभार्थीस सुपूर्त करण्यात येईल
↓
- बँकेकडून खातर जमा केल्यानंतर नियमित
अंशदान
लाभार्थीच्या बँक खात्यामधून (AUTO – DEBIT पद्धतीने ) सुरु होईल.
↓
- भविष्यामध्ये जमा होणाऱ्या अंशदानाबाबतची माहिती लाभार्थीस SMS द्वारे उपलब्ध करून देण्यात येईल.
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.